tukdoji maharaj

संत तुकडोजी श्लोक

या वाचुनी नच मार्ग दुसरा, आजच्या काळी दिसे।
ही प्रार्थना देवादिकी, श्रीविष्णुसी केली असे।।
प्रत्येक जीवा दुःख हे आता नको जगपावन।
उठ आर्यपुत्रा! झडकरी, कर सामुदायिक प्रार्थना ।।
जव राक्षसी वृत्ती बळावे गर्जूनी भूमिवरी |
तव दे निसर्गा चलना त्या दैवीशक्ति श्रीहरि ||
तुकड्या म्हणे परिवर्तना गुरुदेव तैसा जाहला |
गुरुदेव सेवामंडळा हा जन्म भारती लाभला ||
किती पंथ झाले भिन्नसे, अणि राष्ट्रही झाले तसे।
हे धर्म झाले भिन्नसे, जरि तत्त्व गमती एकसे ।।
शेजार धर्महि संपला, आता तरी धरि सोय ना।
उठ आर्य पुत्र झडकरी कर सामुदायिक प्रार्थना
मी सांगतो गुज आपुले, भजने तुम्ही बहु ऐकिली |
सत्कार्य प्रभुचे घ्या करी, जी वेळ आता पातली ||
विश्वस्थ माझ्या बंधुनो! करितो तुम्हा प्रस्तावना |
उठ आर्यपुत्रा ! झडकरी, कर सामुदायिक प्रार्थना ||
शिरी घाली भगवी टोपी आणि हो सज्ज धर्मालागोनी |
 ही त्याग कांबळ खांदी  घे, जाई प्रचारासी झणी ||
हा पाठ सक्रिय साजिरा, संबोधुनी शिकवी जना |
उपकार सेवा साधण्या कर सामुदायिक प्रार्थना ||
देवादिदेवहि मानती अवतार गुरुसी पूजती |
 पंथादि अणि धर्मादिही गुरुदेव हा सन्मानिती |
नच व्यक्ति, श्रीगुरुशक्ति ही गुरुदेवमंडळ स्थापना |
उठ आर्वपुत्रा ! झडकरी, कर सामुदायिक प्रार्थना ।
एकांगि वाहति पंथ हे किति संप्रदायहि भारती ।
हे सकल देवा वर्णीती परि एक ना यांची मती ।।
हे वर्म घेऊनीया करी सर्वास सुख द्याया भला ।
गुरुदेव  सेवा मंडळ हा जन्म भारती लाभला ।।
संशोधुनी, पंथासही, वा योजने संबोधिले ।
कोणी समन्वय घेईना , भिन्नत्व जेणे पावले ॥।
म्हणुनीच सर्वां घेउनी हा मार्ग निर्मळ साधला ।
गुरुदेव सेवामंडळा हा जन्म भारति लाभला ||
गुरुदेव नानक संत हे संबोधिती त्या काळला
केला त्यांनी यत्न हा, तो ग्रंथ-साहब वाढला ।।
गमली तशी वेळा अता ही स्फूर्ति स्फुरण्या आजला ।
गुरुदेव सेवामंडळा हा जन्म भारति लाभला ||
१०
जव राक्षसी वृत्ती बळावे गर्जूनी भूमिवरी |
तव दे निसर्गा चलना त्या दैवीशक्ति श्रीहरि ||
तुकड्या म्हणे परिवर्तना गुरुदेव तैसा जाहला |
गुरुदेव सेवामंडळा हा जन्म भारती लाभला ||
११
या प्रार्थनेच्या मंदिरातूनी येत वायु मंदसा |
वाटे फूलाया नवकळ्या तो डोलवी त्या मधुरसा ||
त्या विकसता जणू बोलती – गुरुदेव हृदयी जावुया |
गुरुदेव सेवामंडळा दे जन्म भारत भूमि या ||
१२
हृदयावरी ती मालिका जणु वैजयंती शोभली |
अजी भाग्य आले शिखरी या पुष्पेही बोलू लागली ||
जरी राहिलो हृदयीं शोभुया, पडलो तरी चरणीच या |
साधेल पुजा दोहीची वा धन्य! म्हणतील कोणी या ||
_________________________________________
ref: tukdyadas 
संत तुकडोजी श्लोक
संत तुकडोजी श्लोक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *