शुद्ध कार्तिक पाडवा – संत तुकाविप्र अभंग

शुद्ध कार्तिक पाडवा – संत तुकाविप्र अभंग

शुद्ध कार्तिक पाडवा । सण देवादिकाचा
तया सणी वाळवंटी । भक्त भेटी देवाची
कृष्ण वेण्या वाळवंट । हे अविट सर्वस्वे
तेथे विनंती सर्वेशा । भक्त आशा पुरवी
देई सदविद्या सुमती । क्षमा शांती भावार्थ
भीड चाड इतराची । नको साची सहसा
तुकाविप्र म्हणे दया । देवराया करावी

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शुद्ध कार्तिक पाडवा – संत तुकाविप्र अभंग