एकांतांचे सुख देई मज देवा । आघात या जीवा चुकवूनि ॥१॥
ध्यानीं रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडों नेदीं ॥ध्रु.॥
मायबाळा भेटी सुखाची आवडी । तैशी मज गोडी देई देवा ॥२॥
कीर्ती ऐकोनियां जालों शरणांगत । दासाचें तूं हित करितोसी ॥३॥
तुका म्हणे मी तों दीन पापराशी । घालावें पाठीशी मायबापा ॥४॥
अर्थ
अर्थ–हे देवा पांडुरंगा संसारापासून होणारे आघात चुकवून, त्याच्या अपेक्षांचे माझ्यावर होणार आघात चुकवून आता कृपा करून एकांताचे सुख माझ्या पदरात घाल. माझ्या ध्यानात निरंतर तुझे रूप असून मा:झ्या जिव्हेवर सतत तुझे नाम आहे जे मला तुझा विसर किंचितदेखील पडू देत नाही.ज्याप्रमाणे आई आणि तिच्या सानुल्याची भेट होताच दोघांच्या जीवाला सुख लाभते आणि या सुखाची त्याला आवड निर्माण होते तशीच गोडी तू देखील मला भेट देऊन दे. मी तुझी अपार कीर्ती ऐकून तुला शरण आलो आहे कारण शरणागताला तू पाठीशी घालतोस आणि तुझ्या दासाचे तू हित घडवून आणतोस हे मला ठाऊक आहे.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.