नसताचि दाउनि भेव – सार्थ तुकाराम गाथा 1508
नसताचि दाउनि भेव । केला जीव हिंपुटी ॥१॥
जालों तेव्हां कळलें जागा । वाउगा हा आकांत ॥ध्रु.॥
गंवसिलों पुढें मागें । लागलागे पावला ॥२॥
तुका म्हणे केली आयणि । सलगीच्यांनी सन्मुख ॥३॥
अर्थ
जन्म मरणाचे भय दाखवून तुम्ही माझ्या जीवाला कष्टी केले आहे देवा, जेव्हा मला ब्रम्हज्ञान झाले त्यावेळी मला असे जाणवले की जन्म मरणाचे भय आणि त्याविषयी आक्रोश करणे व्यर्थ आहे. मला जन्म मरणाचे भय वाटत होते त्या कारणामुळे मी तुमचा शोध घेण्यास चालू केले नंतर शेवटी मला तुमचा पत्ता मिळाला. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी आणि माझी सलगी करून देणारे संत आहेत त्यांनी मला तुझ्या पुढे उभे केले व ब्रम्हानंदाचा अनुभव करून दिला.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.