न करीं तुमची सेवा । बापुडें मी पण देवा ।
बोलिलों तो पाववा । पण सिद्धी सकळ ॥१॥
आणीक काय तुम्हां काम । आम्हां नेदी तरी प्रेम ।
कैसे धर्माधर्म । निश्चयेंसी रहाती ॥ध्रु.॥
आह्मीं वेचलों शरीरें । तुम्ही बीज पेरा खरें ।
संयोगाचें बरें । गोड होतें उभयतां ॥३॥
एका हातें टाळी । कोठें वाजते निराळी ।
जाला तरी बळी । स्वामीविण शोभेना ॥३॥
रूपा यावे जी अनंता । धरीन पुटाची त्या सत्ता ।
होईन सरता । संतांमाजी पोसणा ॥४॥
ठेविलें उधारा । वरी काय तो पातेरा ।
तुका म्हणे बरा । रोकडा चि निवाड ॥५॥
अर्थ
देवा मी तुमची सेवा अभिमानाने व मी पणाणे करत नाही तर मी बापडा आहे भोळा आहे म्हणून करतो आहे. मी तुमच्या जवळ जी भक्ती आणि प्रेमाची इच्छा केली आहे तेवढी पूर्ण करा. तुम्हाला अजून दुसरे कोणते काम आहे देवा की, तुम्ही आम्हाला प्रेम देण्याकरता थोडावेळ देखील देत नाहीत देवा. तुम्ही आम्हाला प्रेम दिले तर धर्म आणि अधर्म हे आमच्या जवळ निश्चयाने कसे राहतील? देवा आम्ही तुम्हाला आमचे शरीर अर्पण केले आहे आता तुम्ही आमच्या शरीरांमध्ये भक्ती आणि प्रेमाचे खरे बीज पेरा. त्यामुळे तुमचा व माझा संयोग होईल व दोघांमध्ये एकमेकांविषयी थोडी गोडी वाढेल. देवा एका हाताने टाळि वाजते काय? स्वामीचा सेवक कितीही बलवान जरी असला तरी स्वामी नसेल तर ते चांगले वाटत नाही. हे अनंता तुम्ही नाम रूपाला या म्हणजे आम्ही तुमच्या नाम रुपाच्या सत्तेने आमच्या भक्तीला पुष्टता आणू मग मी तुझा प्रिय होऊन संतांमध्ये मान्य होईल व मग संत आमचे पालन-पोषण करतील. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही जर मला भक्ती आणि प्रेम उधार देण्याचे ठेवले तर मा.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.