हेंदऱ्याचें भरितां कान – सार्थ तुकाराम गाथा 1494
हेंदऱ्याचें भरितां कान । हलवी मान भोंक रितें ॥१॥
नाहीं मी येथें सांगों स्पष्ट । भावें नष्ट घेत नाहीं ॥ध्रु.॥
अवगुणी बाटलें चित्त । तया हित आतळे ना ॥२॥
तुका म्हणे फजितखोरा । म्हणता बरा उगा रहा ॥३॥
अर्थ
एखाद्या हेंदर्या मनुष्याला कितीही चांगले उद्देशाने त्याचे कान भरविले तरी काहीच उपयोग होत नाही, तो फक्त तुम्हाला मान हलविण्याचे काम करतो, असे जरी असले तरी त्याच्या कानाचे भोके रिकामेच राहतात. अशा नष्ट लोकांना कितीही चांगला उद्देश करण्याचा प्रयत्न केला तरी ते भक्तिपूर्वक ग्रहण करत नाही त्यामुळे मी येथे काहीच स्पष्ट सांगत नाही.तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे चित्त अवगुणांनी बाटले आहे त्याला किती चांगला उद्देश सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तो उद्देश कळत नाही.
—–
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.