संत तुकाराम महाराज पालखीचे २० जूनला प्रस्थान कारण आहे अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे यांनी सर्व भक्तांना दिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे वारकऱ्यांना जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पायी वारी सोहळा अनुभवता आला नाही. मात्र, यंदा वैष्णवांना हा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवता येणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी श्री क्षेत्र देहूगाव येथून २० जूनला प्रस्थान ठेवणार आहे. २३ जूनला पालखी पुण्यात मुक्कामी असेल. पालखी नऊ जुलैला पंढरपूरला पोचेल, अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे यांनी दिली.
संस्थानने पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पालखी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नैमित्तिक कामे संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आली. परंपरेनुसार यंदा पालखी सोहळा पंढरपुरला मार्गस्थ होत असताना पुणे येथील नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात दोन मुक्काम करणार आहे. तर इंदापूर येथे पालखी तळावर दोन दिवस मुक्काम होईल. इतर ठिकाणी एकच मुक्काम होणार आहे. प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले तर सराटी येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे. माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले बोंडले येथे धावा तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरी येथे पादुका आरती होईल, असेही हभप मोरे यांनी सांगितले.
यंदा १३ जुलैला पालखीच्या परतीच्या प्रवासाची सुरूवात होईल. पालखी सोहळ्याची सांगता २४ जुलैला देहूच्या मुख्य मंदिरात होणार आहे. पालखी मार्गावर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने वारकऱ्यांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो, असे सांगण्यात आले.
पालखी सोहळ्याचा मार्ग व नियोजन:-