20 जूनला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

20 जूनला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

20 जूनला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे जाणून घ्या संपूर्ण पालखी सोहळ्याचे मार्ग व नियोजन पुढीलप्रमाणे


संत तुकाराम महाराज पालखीचे २० जूनला प्रस्थान कारण आहे अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे यांनी सर्व भक्तांना दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे वारकऱ्यांना जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पायी वारी सोहळा अनुभवता आला नाही. मात्र, यंदा वैष्णवांना हा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवता येणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी श्री क्षेत्र देहूगाव येथून २० जूनला प्रस्थान ठेवणार आहे. २३ जूनला पालखी पुण्यात मुक्कामी असेल. पालखी नऊ जुलैला पंढरपूरला पोचेल, अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे यांनी दिली.

संस्थानने पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पालखी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नैमित्तिक कामे संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आली. परंपरेनुसार यंदा पालखी सोहळा पंढरपुरला मार्गस्थ होत असताना पुणे येथील नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात दोन मुक्काम करणार आहे. तर इंदापूर येथे पालखी तळावर दोन दिवस मुक्काम होईल. इतर ठिकाणी एकच मुक्काम होणार आहे. प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले तर सराटी येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे. माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले बोंडले येथे धावा तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरी येथे पादुका आरती होईल, असेही हभप मोरे यांनी सांगितले.

यंदा १३ जुलैला पालखीच्या परतीच्या प्रवासाची सुरूवात होईल. पालखी सोहळ्याची सांगता २४ जुलैला देहूच्या मुख्य मंदिरात होणार आहे. पालखी मार्गावर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने वारकऱ्यांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो, असे सांगण्यात आले.


पालखी सोहळ्याचा मार्ग व नियोजन:-

  • २० जूनः देहूतील मुख्य मंदिरात पालखी प्रस्थान, पहिला मुक्काम श्री क्षेत्र देहूगाव येथील इनामदार साहेब वाड्यात
  • २१ जूनः आकुर्डी विठ्ठल मंदिर
  • २२ व २३ जूनः श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, नाना पेठ, पुणे
  • २४ जूनः लोणी काळभोर
  • २५ जूनः वरवंड
  • २७ जूनः उंडवडी
  • २८ जूनः बारामती शारदा विद्यालय
  • २९ जूनः सणसर (पालखी तळ)
  • ३० जूनः दुपारचे बेलवडी गोल रिंगण, नंतर आंथुर्णे (पालखी सोहळा)
  • १ जुलैः निमगाव केतकी (पालखी तळ)
  • २ जुलैः इंदापूर येथे गोल रिंगण, दोन दिवस मुक्काम
  • ४ जुलैः सराटी ५ जुलै अकलूज (माने विद्यालय येथे गोल रिंगण)
  • ६ जुलैः माळीनगर येथे उभे रिंगण बोरगाव
  • ७ जुलैः तोंडले बोंडले येथे धावा, पिराची कुरोली मुक्काम
  • ८ जुलैः बाजीराव विहीर येथे उभे रिंगण, वाखरी येथे मुक्काम
  • ९ जुलैः पादुका आरती येथे उभे रिंगण झाल्यावर पंढरपूरकडे प्रस्थान, रात्री पंढरपूर येथे श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी विसावणार आहे.
  • १० जुलैः नगर प्रदक्षिणा करून पालखी १३ जुलै दुपारी एक वाजेपर्यंत पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे.
  • १३ जुलैः दुपारी परतीच्या प्रवासाला सुरुवात

20 जूनला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे जाणून घ्या संपूर्ण पालखी सोहळ्याचे मार्ग व नियोजन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *