कामातुरा भय लाज ना विचार – संत तुकाराम महाराज अभंग – 1845

कामातुरा भय लाज ना विचार – संत तुकाराम महाराज अभंग – 1845

कामातुरा भय लाज ना विचार । शरीर असार तृणतुल्य ॥१॥
नवल हे लीळा कर्त्याचें लाघव । प्रारब्धें भाव दाखविले ॥ध्रु.॥
लोभालोभ एका धनाचिये ठायीं । आणिकांची सोई चाड नाहीं ॥२॥
तुका म्हणे भूक न विचारी प्रकार । योजे तें चि सार यथाकाळें ॥३॥

अर्थ

कामातूर व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे भय किंवा लाज वाटत नाही तो कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही शरीर सुखापुढे तो आपले शरीर देखील तृणाप्रमाणे मानतो. त्याचे हे असे चाळे पाहून खरे तर नवल वाटते परंतु त्याच्या प्रारब्धाने त्याच्या ठिकाणी कामभाव उत्पन्न केलेला असतो. कामातूर झालेला माणूस जसा भोग सुखासाठी तरफडतो आणि जसा धनासाठी आसुसलेला मनुष्य वेडा होतो त्या दोघांचेही सामानच कार्य असते त्यांना इतरांची काहीच चिंता वाटत नाही.तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याला भूक लागल्यामुळे त्या मणुष्याला अन्न चांगले आहे की खराब आहे याचा काहीच विचार येत नाही त्यावेळी ते अन्न चांगलेच आहे असे समजून तो अन्न खात असतो


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.