वाळूनियां जन सांडी मज दुरी – संत तुकाराम महाराज अभंग – 1841

वाळूनियां जन सांडी मज दुरी – संत तुकाराम महाराज अभंग – 1841

वाळूनियां जन सांडी मज दुरी । करिसील हरी ऐसें कधीं ॥१॥
आठवीन पाय धरूनि अनुताप । वाहे जळ झोंप नाहीं डोळां ॥ध्रु.॥
नावडती जीवा आणीक प्रकार । आवडी ते फार एकांताची ॥२॥
तुका म्हणे ऐसी धरितों वासना । होई नारायणा साह्य मज ॥३॥

अर्थ

हे हरी लोक माझा तिरस्कार करून मला एकांतात दूर कधी लोटून देतील व अशी परिस्थिती तु माझी कधी करणार आहेस? एकदा की मला या लोकांनी दूर लोटून दिले की मी अनुताप करून तुझ्या पायाचे सतत चिंतन करीन आणि या कारणामुळे माझ्या डोळ्याला झोपही लागत नाही व सारखे त्या डोळ्यातून अश्रु वाहत आहेत. माझ्या जीवाला तर इतर कोणतेही प्रकार आवडत नाही केवळ एकांताची आवड माझ्या जीवाला फार आहे . तुकाराम महाराज म्हणतात देवा नारायणा मी अशीच वासना माझ्या मनात धरली आहे आणि ती वासना पूर्ण करण्यासाठी तू मला साह्य व्हावे


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.