काय तुझे उपकार पांडुरंगा – संत तुकाराम महाराज अभंग – 1840

काय तुझे उपकार पांडुरंगा – संत तुकाराम महाराज अभंग – 1840

काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगों मी या जगामाजी आतां ॥१॥
जतन हें माझें करूनि संचित । दिलें अवचित आणूनियां ॥ध्रु.॥
घडल्या दोषांचें न घली च भरी । आली यास थोरी कृपा देवा ॥२॥
नव्हतें ठाउकें आइकिलें नाहीं । न मगतां पाहीं दान दिलें ॥३॥
तुका म्हणे याच्या उपकारासाठी । नाहीं माझें गाठीं कांहीं एंक ॥४॥

अर्थ

हे पांडुरंगा तुझे माझ्यावर उपकार आहेत हे जगाला मी सांगू तरी कसे? तू आज पर्यंत माझे पूर्व पुण्याचे संचित जतन करून ठेवले आणि अवचितच माझ्या हातात आणून दिले आहे. माझ्याकुन घडलेल्या दोषांच्या भरिला तू माझे पुर्वपुण्य घातले नाहीस त्यामुळेच माझे पूर्वपुण्य जसेच्या तसे राहून मी मनुष्य देहाला आलो हिच तुझी माझ्यावर खूप मोठी कृपा आहे देवा. देवा मला जे दान कधी माहीत नव्हते, कधी जे दान मी ऐकलेही नाही, कधी जे दान मी पाहिले नाही ते दान तु मला दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू माझ्यावर एवढा मोठा उपकार केला परंतु त्या बदल्यात तुला देण्यासाठी माझ्या पदरात काहीच नाही


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.