कवतुकवाणें । बोलों बोबड्या वचनें ॥१॥
हें तों नसावें अंतरीं । आम्हां धरायाचें दुरी ॥ध्रु.॥
स्तुति तैसी निंदा । माना समचि गोविंदा ॥२॥
तुका म्हणे बोलें । मज तुह्मी शिकविलें ॥३॥
अर्थ
अर्थ : – देवा ,मी तुमच्याशी कौतुकाने व बोबड्या शब्दाने बोलत आहे .तरी माझ्यावर रागावून मला पायापासून दूर करण्याचे तुमच्या मनात येऊ देऊ नये ;हीच माझी विनंती आहे .गोविंदा ,माझ्या बोलण्यात स्तुती अथवा निंदा जरी घडली ,तरी ती तुम्ही सारखीच माना .तुकाराम महाराज म्हणतात ,देवा ,मी तरी आपल्या पदरचे कोठे बोलतो !तुम्ही जसे शिकविले तसे मी बोलत आहे
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.