श्वाना दिली सवे – संत तुकाराम महाराज अभंग – 1832

श्वाना दिली सवे – संत तुकाराम महाराज अभंग – 1832

श्वाना दिली सवे । पायांभोंवतें तें भोंवे ॥१॥
तैसी जाली मज परी । वसे निकट सेजारीं ॥ध्रु.॥
जेवितां जवळी । येऊनियां पुंस घोळी ॥२॥
कोपेल तो धणी । तुका म्हणे नेणें मनीं ॥३॥

अर्थ

एखाद्या कुत्र्याला जर खुप लळा लावला तर ते नेहमी आपल्या पायाभोवती घोटाळत असतो. त्याप्रमाणे हे देवा तू मला लळा लावला आहेस आणि त्या कुत्र्याप्रमाणेच मी तुझ्या पायाजवळ राहत आहे. लळा लावलेला कुत्रा आपण जेवत असलो की आपल्या शेजारी येऊन त्याची शेपटी घोळत असतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा मालक जेवत असताना आपण तेथे गेलो तर मालक आपल्यावर रागवेल असे कुत्र्याच्या मनात सुद्धा येत नाही


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.