लटिकाचि केला – संत तुकाराम महाराज अभंग – 1828

लटिकाचि केला – संत तुकाराम महाराज अभंग – 1828

लटिकाचि केला । सोंग पसारा दाविला ॥१॥
अवघा बुडालासी ॠणें । बहुतांचे देणें घेणें ॥ध्रु.॥
लावियेलीं चाळा । बहू दावूनि पुतळा ॥२॥
तुका म्हणे हात । आह्मी आवरीली मात ॥३॥

अर्थ

देवा तु आजपर्यंत जी तुझी पतितपावन, दीनानाथ वगैरे अशी ब्रीदे आहेत, ती सर्व तु खोटे करून दाखवले आहेत. देवा तु भक्तांकडून सेवा रूपी कर्ज घेतले आहेस आणि त्या ऋणानेच तु बुडाला आहेस बऱ्याचश्या भक्तांचे देणे घेणे तुझ्याकडे आहे. देवा तु अनेक प्रकारची रूपे धारण केलेली आहेस आणि तुझ्या रूपाचा चाळा भक्तांना लावला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता आम्ही तुझ्याशी कोणताही व्यवहार करण्याविषयी आमचा हात आवरला आहे आणि तुझ्याशी बोलणे ही कमी केले आहे.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.