नव्हें कांहीं कवणाचा – संत तुकाराम महाराज अभंग – 1824

नव्हें कांहीं कवणाचा – संत तुकाराम महाराज अभंग – 1824

नव्हें कांहीं कवणाचा । भाव जाणवला साचा ॥१॥
म्हणोनि तुझ्या पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥ध्रु.॥
शरीर जायाचें कोंपट । याची काय खटपट ॥२॥
तुका म्हणे वांयांविण । देवा कळों आला सीण ॥३॥

अर्थ

या संसारामध्ये माझा कोणाशीही काहीही संबंध नाही हा सत्य भाव मला समजला आहे. म्हणूनच देवा मी तुझ्या पायी निश्चयाने जीव ठेवला आहे. शरीर हे एक प्रकारचे खोपटच आहे ते कधी ना कधी जाणार आहे मग त्याच्यासाठी एवढी खटपट करण्याची काय गरज आहे? तुकाराम महाराज म्हणतात हे देवा या संसारांमध्ये मी जे काही खटपट करत आहे ती व्यर्थ आहे हे मला चांगले कळून आले आहे


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.