तुजविण देवा – संत तुकाराम महाराज अभंग – 1822

तुजविण देवा – संत तुकाराम महाराज अभंग – 1822

तुजविण देवा । कोणा म्हणे माझी जिव्हा ॥१॥
तरि हो कां शतखंड । पडो झडोनियां रांड ॥ध्रु.॥
कांहीं इच्छेसाठी । करिल वळवळ करंटी ॥२॥
तुका म्हणे कर । कटीं तयाचा विसर ॥३॥

अर्थ

हे देवा हे पांडुरंगा माझी जिव्हा म्हणजेच जीभ तुझ्याशिवाय कोणाला आपली म्हणेल? तुझ्याशिवाय इतर कोणाचे नाव घेईल? परंतु तुझ्या शिवाय तिने जर इतर गोष्टी केल्या किंवा काही इच्छेसाठी तिने जर वळवळ केली तर ती करंटी आहे हे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात जो कटेवर कर ठेऊन उभा आहे अशा या श्रीहरीचा जर तिला विसर पडला तर या रांडेचे शत खंड होवोत, अशी ही करंटी जिव्हा झडून जावो हेच माझे तुझ्याकडे मागणे आहे


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.