आम्ही पतित म्हणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं ।
नाहीं तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्तीं ॥१॥
आम्हां न तारावें तुम्ही काय करावें । सांगीजोजी भावें नारायणा ॥ध्रु.॥
अन्याय कोणाचा अंगीकार करणें । तया हातीं देणें लाज तेचि ।
काय ते शूरत्व मिरवूनि बोलणें । जनामाजी दावणें बळरया ॥२॥
पोह्या अन्नछत्र घालूनियां घरीं । दंडितो बाहेरी आलियासी ।
नव्हे कीर्ती कांहीं न मानेचि लोकां । काय विटंबणा जैसी तैसी ॥३॥
प्रत्यक्षासी काय द्यावें गा प्रमाण । पाहातां दर्पण साक्ष काई ।
तुका म्हणे तरी आम्हां का न कळे । तरलों किंवा आम्ही नाहीं ॥४॥
अर्थ
देवा आम्ही पतित आहोत म्हणूनच तुला शरण आलो आहोत त्यामुळे आम्ही तुझे चिंतन रात्रंदिवस करीत आहोत. देवा जर आम्ही पतीत नसतो तर तुझी भिड आम्ही चित्तात का धरली असती? देवा हे नारायणा तुम्ही जर आमचा उद्धार करणार नाही तर मग तुम्ही आमचे काय करणार ते खरे सांगा. ज्याने आमचा अंगीकार करून दुसऱ्याच्या हाती आम्हाला दिले अशी ज्याची चूक आहे, त्याची ही लाजिरवाणी चूक त्यानेच स्वीकारावी. देवा अहो तुमची दीनानाथ ,पतितपावन म्हणून ब्रिदे आहे, केवळ त्याचेच तुम्ही भूषण जगामध्ये मिरवता शुर व्यक्तीने केव्हा ही शुरत्वाच्या गप्पा मारू नये त्याचे भुषण मिरवून उगाच बरळु नये. घराबाहेर पाणपोया अन्नछत्र घालतो आणि बाहेर आलेल्या भुकेल्यांना तहानलेल्यांना परत हाकलूनही लावतो याला काय अर्थ आहे काय? जर असे त्याने केले तर त्याची कीर्ती जगामध्ये होणार नाहीये लोकांना तो पटायचा नाही आणि त्याने असे करणे म्हणजे ती एक प्रकारची विटंबना नाही काय? तुकाराम
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.