तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति – संत तुकाराम महाराज अभंग – 1816

तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति – संत तुकाराम महाराज अभंग – 1816

तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥१॥
कोण हित तेणें देखिलें आपुलें । आणीक पाहिलें सुख काई ॥ध्रु.॥
धान्यें बीजें जेणें जाळोनि सकळें । पेरितो काऱ्हाळे जिरें बीज ॥२॥
मोडोनिया वाटा पुढिलांची सोय । आडरानें जाय घेउनि लोकां ॥३॥
विषाचें अमृत ठेवूनियां नाम । करितो अधम ब्रम्हहत्या ॥४॥
तुका म्हणे त्यास नाइके सांगतां । तया हाल करितां पाप नाहीं ॥५॥

अर्थ

जो मूर्ख सुगंधी पुष्पवाटिका व मधुर फळांचे वृक्ष तोडून बाबळीचे रक्षण करतो, त्याने आपले हित कशात पाहिले आणि आपले सुखही त्याने कशात पाहिले आहे?जो सर्व प्रकारचे धान्याचे बीजे जाळून कार्‍हाळे आणि जीरे या बीजांची पेरणी करतो, मागे झालेल्या संतांनी जी परमार्थाची चांगली वाट निर्माण केली ती वाट सोडून देऊन जो लोकांना आड रानाने घेऊन जातो. आणि जो विषाचे नाम ‘अमृत’ आहे असे म्हणतो व ते घेऊन दुसऱ्याला देतो.तो ब्रम्ह हत्या सारखे पातक करतो असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात अशा मूर्ख मनुष्यला कितीही समजावून सांगितले चांगला उपदेश केला तरीही ते ऐकत नाही मग अशाची आपण कितीही फजिती केली कितीही हाल केले तरी त्यापासून पाप लागत नाही.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.