परिस काय धातु सोने न करीतु – संत तुकाराम महाराज अभंग – 1815

परिस काय धातु सोने न करीतु – संत तुकाराम महाराज अभंग – 1815

परिस काय धातु सोने न करीतु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥१॥
काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक ॥ध्रु.॥
कल्तपरु कोड पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिलें तें ॥२॥
चंदनांच्या वासें वसतां चंदन । होती काष्ठ आन वृक्षयाती ॥३॥
काय त्याचें उणें जालें त्यासी देतां । विचारीं अनंता तुका म्हणे ॥४॥

अर्थ

परीस लोखंडाला सोने करीत नाही काय? निश्चितच करतो तो लोखंडाचे लोखंड पण ही नाहीसे करतो. मग देवा तू त्याच्यापेक्षाही हिन झाला आहेस काय?मी तुला एखादे संकट सांगितले तर तु ते पूर्ण करत नाहीस. कल्पतरू आपल्या मनात जे असेल ती लगेच इच्छा पूर्ण करतो आणि चिंतामणी तर खडा आहे, आपण ज्याचे चिंतन करू ते लगेच तो पुरवतो. चंदनाच्या सहवासातच कोणतेही वृक्ष किंवा कोणतेही काष्ट राहिले तरी ते चंदनाप्रमाणे सुगंधित होते. तुकाराम महाराज म्हणतात देवा परीस, चंदन, चिंतामणी, कल्पतरू यांना स्वतःचे गुण दुसऱ्याला देताना त्यांचे स्वतःचे काही नुसकान झाले आहे काय, हे अनंता त्यांना तु विचारून पहा


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.