लापणिक शब्दें नातुडे हा देव – संत तुकाराम महाराज अभंग – 1812

लापणिक शब्दें नातुडे हा देव – संत तुकाराम महाराज अभंग – 1812

लापणिक शब्दें नातुडे हा देव । मनिंचा गुह्य भाव शुद्ध बोला ॥१॥
अंतरिंचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥ध्रु.॥
तुका म्हणे जरी आपुलें स्वहित । तरी करीं चित्त शुद्ध भावें ॥२॥

अर्थ

अहो कपटी शब्दाने बोलून देवाचे प्राप्ती केव्हाही करून घेता येत नाही तर त्याकरता जो मनातील गोड भाव आहे तो शुद्ध चित्ताने बोलावा. संवाद करणाऱ्या व्यक्तीचे अंतरंगातील भेद परमानंद जाणत असतो. तुकाराम महाराज म्हणतात जर तुला आपले स्वतःचे हीत करून घ्यायचे असेल तर तुझे चित्त भक्तिभावपूर्वक शुद्ध कर.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.