देवा तुज मज पण – संत तुकाराम महाराज अभंग – 1811

देवा तुज मज पण – संत तुकाराम महाराज अभंग – 1811

देवा तुज मज पण । पाहों आगळा तो कोण ॥१॥
तरी साच मी पतित । तूंच खोटा दिनानाथ ।
ग्वाही साधुसंत जन । करूनि अंगीं लावीन ॥ध्रु.॥
आम्ही धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छंद ॥२॥
न चले तुझे कांहीं त्यास । आम्ही बळकाविले दोष ॥३॥
दिशा भरल्या माझ्या मनें । लपालासी त्याच्या भेणें ॥४॥
तुका म्हणे चित्त । करी तुझी माझी नीत ॥५॥

अर्थ

देवा तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे ते पाहूया. देवा अरे मी तर खरोखर पतित आहे पण तू खोटा दीनानाथ आहेस. कारण या गोष्टीला स्वतः साधुसंत जनच साक्षी आहेत आणि त्यांच्याद्वारे मी हा दोष सिद्ध करून तुझ्या अंगी लगीन देवा. देवा आम्ही तर भेदाभेद धरला परंतु तुला तर त्याचा छंद नाही. अरे आमच्या मध्ये तर काम ,क्रोध असे अनेक दोष आहेत पण तझ्या पुढे त्याचे काहीही चालत नाही. माझे मन तर दाही दिशांकडे पाहत आहे आणि त्या मनाला आवरण्याच्या भीतीनेच तु कुठेतरी लपून बसला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे माझे चित्त तुझ्यातील व माझ्यातील नीतिचा विचार करीत आहे.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.