अनुहात ध्वनि वाहे सकळां पिंडीं – संत तुकाराम महाराज अभंग – 1807

अनुहात ध्वनि वाहे सकळां पिंडीं – संत तुकाराम महाराज अभंग – 1807

अनुहात ध्वनि वाहे सकळां पिंडीं । राम नाहीं तोंडीं कैसा तरे ॥१॥
सकळां जीवांमाजी देव आहे खरा । देखिल्या दुसरा विण न तरे ॥ध्रु.॥
ज्ञान सकळांमाजी आहे हें साच । भक्तीविण तेंच ब्रम्ह नव्हे ॥२॥
काय मुद्रा कळल्या कराव्या सांगतां । दीप न लगतां उन्मनीचा ॥३॥
तुका म्हणे नका पिंडाचें पाळण । स्थापू नारायण आतुडेना ॥४॥

अर्थ

योगाभ्यासाने सर्व हृदयात अनाहत ध्वनी एकसारखा होत असला तरी ,”रामनाम “तोंडात नसेल तर तो कसा तरून जाईल ? सर्व जीवामध्ये परमेश्वराची व्याप्ती आहे ,ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा आपल्याशी तो अभिन्न आहे ,असे ज्ञान झाल्याशिवाय कोणीही कसा तरेल ?अर्थात अभेदाने साक्षात्कार झाल्यावाचून तरावयाचा नाही .सर्व लोकांत ज्ञान आहे ,हे खरे.परंतु सगुण भक्तीवाचून ते ज्ञान ‘ ब्रम्‍हज्ञान ‘ होत नाही .कदाचित ब्रम्‍हज्ञान झाले तरी ते ब्रम्‍हज्ञान ‘ ब्रम्‍हस्वरूप ‘ होत नाही .वृत्तीरूपाने राहते .खेचरी भूचरी मुद्रा स्वतःला कळल्या आणि कशा कराव्यात हेही लोकांना सांगता आले ,तरी पण उन्मनीचा दीप हृदयात उजळल्याशिवाय तो कसा तरेल ?तुकाराम महाराज म्हणतात ,देहाचे पोषण ज्यात आहे ,अशा चार्वाकमताची स्थापना करू नका ,कारण ,त्यामुळे नारायणाची प्राप्ती होणार नाही .

वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.