पांडुरंगे ये वो पांडुरंगे – संत तुकाराम महाराज अभंग – 1802

पांडुरंगे ये वो पांडुरंगे – संत तुकाराम महाराज अभंग – 1802

पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥१॥
कनवाळू कृपाळू भक्तंलागीं मोही । गजेंद्राचा धांवा तुवां केला विठाई ॥ध्रु.॥
भक्तंच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले । आंबॠषीकारणें जन्म दाहा घेतले ॥२॥
प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥३॥
उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं । पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायीं ॥४॥
कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणीं वस्त्रें कैसी जाली माऊली ॥५॥
दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं । धांवसी लवलाहीं शाखदेठ घेऊनि ॥६॥
कृपाळू माउली भुक्तीमुक्तीभांडार । करीं माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ॥७॥

अर्थ

हे जिवाच्या जिवलगा पांडुरंगा तु माझ्याकरता लवकर धावत यावे. हे विठाई तु कनवाळू कृपाळू आहेस भक्तासाठी तु लवकर मोहित होणारी आहेस त्यामुळेच गजेंद्राने तुला हाक मारली तर तु त्याच्या मदतीला लगेच धावत गेलीस. हे विठ्ठला तु भक्तांचा कैवार करण्यासाठी खूप कष्ट घेतोस अंबरिष राजा साठी तु दहा जन्म घेतलेस. देवा तु प्रल्हादासाठी स्तंभातून अवतार घेतलास आणि त्याच्या करता तु हिरण्यकश्यपु सारख्या दैत्याचा वध केला आणि भक्त प्रल्हादाला तु प्रेमाचा पान्हा पाजलास. देवा तु उपमन्यू करता कसा लवकर धावून आलास त्याला दुधाचा सागर देऊन तुझ्या प्रेमाचा पान्हा पाजलास. कौरवांच्या सभेमध्ये ज्यावेळी पांचाळीला ओढून आणले त्यावेळीला तिचे वस्त्रहरण करण्यात आले परंतु माझी विठाबाई माऊली तिची लज्जा रक्षण करण्याकरता स्वतः वस्र रूपाने तिच्या अंगावर येऊन राहिली. धर्मराजा वनवासात असताना दुर्वास ऋषी आपले


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.