एक गावें आह्मीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥१॥
मोडूनियां वाटा सूक्ष्म दुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा ॥ध्रु.॥
लावूनि मृदंग श्रुतिटाळ घोष । सेवूं ब्रम्हरस आवडीनें ॥२॥
तुका म्हणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळा मात्रें ॥३॥
अर्थ
आम्ही केवळ एका विठोबाचेच नाम गाणार आहोत आता या ठिकाणी इतर कोणाचेही काहीच काम नाही. कर्माच्या सूक्ष्म वाटा आणि योगाच्या दुस्तर वाटा मोडून राजाचे चतुरंग सैन्य जेवढे बलाढ्य असतेउ तेवढा मोठा मार्ग आम्ही प्रस्तापित केला. आता आम्ही मृदंग ,विना, स्वरात लावू व टाळाचा घोष करून ब्रम्ह रस आवडीने सेवन करू. तुकाराम महाराज म्हणतात कोणी किती ही महा घातकी असो त्यांनी हरीचे नाम श्रद्धेने घेतले तर त्याचे हित व तो जिवनमुक्त तात्काळ होतात.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.