चालिती आड वाटा । आणिकां दाविती जे नीटा ॥१॥
न मनीं तयांचे उपकार । नाहीं जोडा तो गंव्हार ॥ध्रु.॥
विष सेवूनि वारी मागें । प्राण जातां जेणें संगें ॥२॥
बुडतां हाक मारी । ठाव नाहीं आणिकां वारी ॥३॥
तुका म्हणे न करीं हिंका । गुण घेऊन अवगुण टाका ॥४॥
अर्थ
स्वतः आडवाटेने गेल्यामुळे ज्याला त्रास होतो व आपल्याला झालेला हा त्रास दुसऱ्याला होऊ नये याकरता जो चांगला मार्ग दाखवतो, मग त्याचे(चांगला मार्ग दाखविणारा) जो उपकार मानत नाही या जगामध्ये त्याच्यासारखा दुसरा महामूर्ख नाही असे समजावे. एखाद्या व्यक्तीने विष घेतले आणि ते त्याच्या प्राणावर बेतले, आणि मग त्याने इतराला समजून सांगितले कि ,असले व्यवहार तुम्ही करू नका याने त्रास होतो तर त्याचेही उपकार मानावेत. स्वतः पाण्यात बुडत असताना जो दुसर्याला सांगतो की तुम्ही इथे येऊ नका पाणी येथे खूप खोल आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशावेळी तो मनुष्य कसाही असला तर तुम्ही हेक्कड पणा करू नका त्या व्यक्तीचे चांगले गुण घेऊन अवगुण बाजूला टाका.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.