मागतियाचे दोनचि कर -संत तुकाराम महाराज अभंग – 1756

मागतियाचे दोनचि कर -संत तुकाराम महाराज अभंग – 1755

मागतियाचे दोनचि कर । अमित भांडार दातियाचें ॥१॥
काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥
एकें सांठवणें प्रेमें वोसंडलीं । जिव्हा हे भागली करितां माप ॥२॥
तुका म्हणे आतां आहे तेथें असो । अंकुनियां बैसों पायांपाशीं ॥३॥

अर्थ

दान देणाऱ्याला दोनच हात आहेत परंतु दात्याच्या घरी अमीत प्रेम रुपी भांडार भरलेले आहे. आता मी काय करू तुझे प्रेम रुपी दान कशात भरू हा विचारच मला पडलेला आहे. अंतकरण तुझ्या भक्ती प्रेमाने भरलेले आहे आणि ते ओसंडून वाहत आहे आणि जिव तर तुझ्या नामाचा जप करता करताच थकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी जसा आत्ता आहे तसाच राहतो तुझा आज्ञाधारी दास बनवून तुझ्या पायापाशी राहतो.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.