आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥१॥
मायबापाचीं लाडकीं । कळों आलें हें लौकिकीं ॥ध्रु.॥
नाहीं निरपराध । कोणां आम्हांमध्यें भेद ॥२॥
तुका म्हणे मान । अवघें आमचें हें धाम ॥३॥
अर्थ
त्रिभूवन म्हणजे आमचा स्वदेश आहे व त्यामध्येच आम्ही वास्तव्य करत आहोत. आम्ही रखुमाईचे आणि विठ्ठलाचे लाडके लेकरे आहोत हे सर्वांनाच कळून आले आहे. आम्ही कोणामध्येही भेद मानत नाही व कोणालाही दुष्ट समजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्व धाम म्हणजे हे केवळ आमच्यासाठी हरीनामच आहे.”
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.