मुदलामध्यें पडे तोटा – संत तुकाराम महाराज अभंग – 1727

मुदलामध्यें पडे तोटा – संत तुकाराम महाराज अभंग – 1727

दलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥१॥
आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं जिंतिलें ॥ध्रु.॥
एके सांते सरिखीं वित्तें । हानि हिते वेगळालीं ॥२॥
तुका म्हणे हित धरा । नव्हे पुरा गांवढळ ॥३॥

अर्थ

ज्या व्यापारामुळे मुद्दलामधे तोटा होतो तो व्यापार खोटा आहे. अरे ज्यांनी आळसाला जिंकले आहे त्यांना पाहून तरी तुला लाज कशी वाटत नाही ? या जगामध्ये भगवंताने सर्वांना मन, बुध्दी, इंद्रिय आणि मनुष्यदेह हे भांडवल सारखेच दिले आहे असे असून देखील एकाला फायदा व एकाला तोटा का होतो आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “याकरता आपले हित होण्यासाठी तुम्ही काहीतरी विचार करा एकदमच असे गावंढळ सारखे राहू नका.”


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.