उपेक्षिला येणें कोणी शरणागत – संत तुकाराम महाराज अभंग – 1715

उपेक्षिला येणें कोणी शरणागत – संत तुकाराम महाराज अभंग – 1715

उपेक्षिला येणें कोणी शरणागत । ऐसी नाहीं मात आईकिली ॥१॥
आतां काय ब्रीद सांडील आपुलें । ठायींचें धरिलें जाणोनियां ॥ध्रु.॥
माझ्या दोषासाठीं होईल पाठमोरा । ऐसा कोण पुरा भोग बळी ॥२॥
तुका म्हणे रूप आमुच्या कैवारें । धरिलें गोजिरें चतुर्भुज ॥३॥

अर्थ

ब्रीद सर्व गोष्टी जाणूनच धारण केलेले आहे. माझा असा काय दोष आहे की जेणेकरून देव मला पाठमोरा होईल. तुकाराम महाराज म्हणतात हरीने गोजिरे चतुर्भूज रूप केवळ आम्हा भक्तां करिता धारण केले आहे.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.