भांडावें तों हित – संत तुकाराम अभंग – 1700
भांडावें तों हित । ठायी पडा तें उचित ॥१॥
नये खंडों देऊं वाद । आम्हां भांडवलभेद ॥ध्रु.॥
शब्दासारसें भेटी । नये पडों देऊं तुटी ॥२॥
तुका म्हणे आळस । तोचि कारणांचा नास ॥३॥
अर्थ
देवाशी भांडण केले की हितच होते आणि उचित काय आहे हे समजते लगेच कळूनही येते. याकरिता आम्ही देवाशी भांडण करणे थांबवणार नाही आणि आमच्यामधील जो भेद आहे तोच याला कारण आहे की आम्ही एकमेकांशी बोलू शकतो म्हणजे देव आणि मी वेगळा आहे त्यामुळेच मी देवाशी बोलू शकतो जर मी अद्वैतरूपाने देवाला पाहिले तर मी त्याच्याशी बोलू शकत नाही कारण त्यावेळी देव आणि मी एकच असु. देवा सारस नावाचे पक्षी यांची एकमेकांशी भेट जरी झाली नाही तरी ते शब्दानेच भेटतात त्याप्रमाणे आम्ही तुझ्याशी बोलणे थांबवणार नाही कारण तुझ्याशी बोलणे झाले म्हणजे भेट झाल्यासारखेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे आळस धरू नये सारखा देवाशी संवाद करावा आणि जर देवाशी संवाद केला नाही तर देवाच्या कार्यात अडथळा होईल.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.