सांपडला हातीं – संत तुकाराम अभंग – 1686

सांपडला हातीं – संत तुकाराम अभंग – 1686

सांपडला हातीं । तरी जाली हे निंश्चिती ॥१॥
नाहीं धांवा घेत मन । इंद्रियांचें समाधान ॥ध्रु.॥
सांडियेला हेवा । अवघा संचिताचा ठेवा ॥२॥
तुका म्हणे काम । निरसुनियां घेतों नाम ॥३॥

अर्थ

माझ्या हाती तुला साध्य करण्याचे वर्म लागले आहे त्यामुळे आता मी खऱ्या अर्थाने निश्चिन्त झालो आहे.त्यामुळे माझे मन देखील आता इंद्रियांच्या ओढीने धाव घेत नाही किंबहुना माझी सर्वच इंद्रिये अतिशय समाधानी झाली आहेत.तसेच माझ्या मनाला आता कसलाही आणि कोणताही हेवा नाही, सर्वच अपेक्षांचा आणि संचिताचा त्याच्याकडून त्याग झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात एवढेच नव्हे तर माझ्या मनाने आता एवढी मजल मारली आहे की सर्व काम आणि कामना ह्यांचा त्याला विसर पडून ते फक्त आणि फक्त आता हरीचे नाम घेण्यात गुंतले आहे.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.