जेथें जेथें जासी – संत तुकाराम अभंग – 1684
जेथें जेथें जासी । तेथें मजचि तूं पाहासी ॥१॥
ऐसा पसरीन भाव । रिता नाहीं कोणी ठाव ॥ध्रु.॥
चित्त जडलें पायीं । पाळती हें ठायीं ठायीं ॥२॥
तुका म्हणे पोटीं । देवा घालुनि सांगें गोष्टी ॥३॥
अर्थ
मी जेथे जाईल तेथे तू मलाच पाहणार आहे. मी माझा भक्तिभाव असा विकसित करीन की जगातील कोणतीच जागा शिल्लक राहणार नाही. आणि देवा माझे चित्त तुमच्या पायाशी एकरूप झालेले आहे ते तुमच्या वर पाळद ठेवून म्हणजे नजर ठेवून आहे. तुम्ही जेथे जेथे जाल तेथे तुमचा मी शोध घेईल व माझा तुम्ही शोध कराल. तुकाराम महाराज म्हणतात मी देवाला माझ्या पोटात साठवून ठेवेल म्हणजेच मी ब्रम्हरूप होईल आणि मग त्याच्या स्वरूपाच्या गोष्टी लोकांना सांगेन.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.