आतां न करीं सोस । सेवीन हा ब्रम्हरस ॥१॥
सुखें सेवीन अमृत । ब्रम्हपदींचें निश्चित ॥ध्रु.॥
तुमचा निज ठेवा । आम्ही पाडियेला ठावा ॥२॥
तुका म्हणे देवराजा । आतां लपलेती वांयां ॥३॥
अर्थ
आता देवापुढे मी कोणत्याही प्रकारचे कष्ट करणार नाही केवळ ब्रम्हरसच आनंदाने सेवन करीन. ब्रम्हपदाचे अमृत मी सुखाने व निश्चिंती ने आणि आवडीने सेवन करेल. देवा तुमच्या नीजस्वरूपाचा ठेवा आम्ही माहीत करून घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आमच्यापासून लपवून बसला आहात परंतु आम्हाला तुमच्या विषयी सर्व काही समजले आहेत त्यामुळे तुम्ही जे काही वागत आहात म्हणजे आमच्यापासून लपून बसत आहात ते सर्व व्यर्थ आहे असेच म्हणावे लागेल.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.