ब्रम्हरसगोडी तयांसी फावली – संत तुकाराम अभंग – 1657
ब्रम्हरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली समूळ ज्यांची ॥१॥
नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या ॥ध्रु.॥
मन हें निश्चळ जालें एके ठायीं । तयां उणें काई निजसुखा ॥२॥
तेचि पुण्यवंत परउपकारी । प्रबोधी त्या नारीनरलोकां ॥३॥
तुका म्हणे त्यांचे पायीं पायपोस । होऊनियां वास करिन तेथें ॥४॥
अर्थ
ज्याची वासना समुळ नष्ट झाली त्याला ब्रम्ह रसाच्या गोष्टीचा अनुभव येतो. त्याला कोणत्याही प्रकारचे विटाळ नसते व तो नेहमी सोहळ्यात असतो तो सर्वांपेक्षा वेगळा असतो शुद्ध असतो एवढेच नाही तर मी ब्रम्ह आहे ही जाणीव देखील त्याच्या ठिकाणी नसते. त्याचे मन स्थिर असते, चंचल नसते स्वरूपस्थितीच्या ठिकाणी त्याचे मन स्थिर असल्यामुळे त्याला स्वरूपाची जाणीव तरी कशी असणार? जो शरण आलेल्या नरनारी ला प्रबोध करतो म्हणजे उपदेश करतो तो खरा परोपकारी आहे असे समजा. तुकाराम महाराज म्हणतात अशा ब्रम्ह रसाच्या ठिकाणी तल्लीन असलेल्या ब्रम्हज्ञान्याच्याजवळ त्याचे पाय होऊन मी राहील व ब्रम्ह रस सेवन करीन.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.