चंचळीं चंचळ निश्चळीं निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी ॥१॥
सोपें वर्म परि मन नाहीं हातीं । हा हा भूत चित्तीं भ्रम गाढा ॥ध्रु.॥
रविबिंब नाहीं तुटत उदका । छायेची ते नका सरी धरूं ॥२॥
तुका म्हणे भय धरी रज्जूसाठीं । नाहीं साच पोटीं कळलें तों ॥३॥
अर्थ
पाणी उतारावर गतीने तर सारख्या जमिनीवर स्थिर पणाने आणि खाचखळग्यांच्या ठिकाणी खळखळ करत वाहते. ब्रम्हज्ञान प्राप्त होण्याचे वर्म सोपे आहे परंतु मन स्वाधीन नसल्यामुळे ते प्राप्त होत नाही आणि माणसाच्या चित्तात गाढा भ्रम आहे की “मी देह” आहे त्यामुळे ब्रम्हज्ञान होण्यास कठीण जाते. पाण्यात सुर्याचे प्रतिबिंब पडते ते प्रतिबिंब म्हणजे तुम्ही सूर्य समजू नका. तुकाराम महाराज म्हणतात रस्त्यात दोरी पडली की दोरी सर्पा सारखी दिसते मग माणसे त्या दोरी चे भाय मनात धरतात परंतु ते भय कोठपर्यंत असते जोपर्यंत आपल्याला दोरीचे ज्ञान होत नाही तोपर्यंतच.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.