संतसेवेसि अंग चोरी – संत तुकाराम अभंग – 1600

संतसेवेसि अंग चोरी – संत तुकाराम अभंग – 1600

संतसेवेसि अंग चोरी । दृष्टी न पडो तयावरी ॥१॥
ऐसियासी व्याली रांड । जळो जळो तिचें तोंड ॥ध्रु.॥
संतचरणीं ठेवितां भाव । आपेंआप भेटे देव ॥२॥
तुका म्हणे संतसेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा ॥३॥

अर्थ

संतसेवा रण्याकरता जो अंग चोरतो म्हणजे कंटाळा करतो अशा अधम व्यक्तीवर माझी दृष्टी देखील पडू नये. अशा दुष्ट माणसाची रांड आई तिने याला जन्मच का दिला असेल तिचे तोंड जळून जावो. संतांच्या चरणी भक्तीभाव ठेवला की देव आपोआप भेटतो. तुकाराम महाराज म्हणतात, “संतसेवा करणे हाच माझा पूर्वजांचा ठेवा आहे.”


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.