पुढें जाणें लाभ घडे – संत तुकाराम अभंग – 1598

पुढें जाणें लाभ घडे – संत तुकाराम अभंग – 1598

पुढें जाणें लाभ घडे । तेंचि वेडे नासती ॥१॥
येवढी कोठें नागवण । अंधारुण विष घ्यावें ॥ध्रु.॥
होणारासी मिळे बुद्धि । नेदी शुद्धी धरूं ते ॥२॥
तुका म्हणे जना सोंग । दावी रंग आणीक ॥३॥

अर्थ

एखादया सत्कर्माने पुढे लाभ होणार आहे हे माहित असले तरी हे वेडे लोक त्याचा नाश करतात. अंधारामध्ये विष घ्यायचे आणि कोणाला कळूही देखील दयायचे नाही एवढा कोठे आत्मघातकीपणा असतो काय ? पुढे होणा-या घटनाला अनुसरुनच कर्म करण्याची बुध्दी आपोआप तयार होते व असे कर्म करु नये अशी सावधगिरी ठेवण्याची शुध्दही त्यावेळी राहात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “असे अनेक लोक आहेत की जे स्वत:ला शहाणे समजतात व अनेक प्रकारचे सोंग लोकांमध्ये दाखवतात अनेक प्रकारचे रंग दाखवतात.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.