हा गे माझा अनुभव – संत तुकाराम अभंग – 1589
हा गे माझा अनुभव । भक्तीभाव भाग्याचा ॥१॥
केला ॠणी नारायणा । नव्हे क्षण वेगळा ॥ध्रु.॥
घालोनियां भार माथा । अवघी चिंता वारली ॥२॥
तुका म्हणे वचनासाठी । नाम कंठीं धरियेले ॥३॥
अर्थ
आणि त्यामुळे तो माझ्यापासून एक क्षणभर देखील वेगळा राहात नाही. मी माझ्या सर्व योगक्षेमाचा भार त्याच्या माथ्यावर घातला असून त्यामुळे माझी सर्व चिंताच नष्ट झाली आहे.” तुकाराम महाराज म्हणतात, “वेदशास्त्रात पुराणात तसेच पूर्वीच्या संतांनी सांगितले आहे की, हरीचे नाम घेतल्याने हरी तुमचा ऋणी होईल त्यामुळे मी कंठात हरीनाम धारण केले आहे.”
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.