आम्ही उतराई – संत तुकाराम अभंग – 682

आम्ही उतराई – संत तुकाराम अभंग – 682


आम्ही उतराई । भाव निरोपोनि पायीं ॥१॥
तुम्ही पुरवावी आळी । करावी ते लडिवाळीं ॥ध्रु.॥
आमुचा हा नेम । तुम्हां उचित हा धर्म ॥२॥
तुका म्हणे देवा । जाणों सांगितली सेवा ॥३॥

अर्थ

हे विठ्ठला आम्ही आमच्या हृदयातील भाव तुझ्या चरण कमलावरती अर्पण करून मोकळे झालो आहोत.आम्ही जो हट्ट प्रेमाने तुझ्या जवळ करावा,तो तू पुरवावा.आम्ही असा हट्ट करणे हा आमचा नेम आहे,आणि तुम्ही तो हट्ट पुरवावा हा तुमचा स्वभाव धर्म आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुम्ही आम्हाला जी काही सेवा सांगितली आहे ती आम्ही जाणतो आहोत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

आम्ही उतराई – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.