माझी विठ्ठल माउली – संत तुकाराम अभंग – 681

माझी विठ्ठल माउली – संत तुकाराम अभंग – 681


माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हाइली ॥१॥
कुर्वाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ध्रु.॥
केली पुरवी आळी । नव्हे निष्ठुर कोंवळी ॥२॥
तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥

अर्थ

माझी विठाबाई माऊली माझ्या वरील प्रेमाने ती प्रेमरूपी पान्ह्याने पान्हावली आहे.ती विठाबाई मला प्रेमाने कुरवाळीत आहे,व ती विठाबाई मला जवळून एक क्षण भरही दूर करत नाही व दूर जात नाही.मी जी मागणी करत आहे ती मागणी ती विठाबाई पूर्ण करते व ती विठाबाई निष्टुर नाही ती विठाबाई अतिशय कोमल आहे.तुकाराम महाराज म्हणतात हि विठाबाई माझ्या मुखात ब्रम्ह रसाचा घास भरवत आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

माझी विठ्ठल माउली – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.