देवासाठी जाणा तयासीच – संत तुकाराम अभंग – 997
देवासाठी जाणा तयासीच आटी । असेल ज्या गांठीं पुण्यराशी ॥१॥
निर्बळा पाठवी बळें वाराणसी । मेला आला त्यासी अर्ध पुण्य ॥ध्रु.॥
कथें निद्राभंग करावा भोजनीं । तया सुखा धणी पार नाहीं ॥२॥
यागीं ऋण घ्यावें द्यावें सुख लाहीं । बुडतां चिंता नाहीं उभयतां ॥३॥
तुका म्हणे वर्म जाणोनि करावें । एक न घालावें एकावरी ॥४॥
अर्थ
ज्याच्या जवळ पुण्याची राशी असेल तोच हरी कर्मासाठी खटपट करतो.एखाद्या गरिबाला जर कोणी मदत करून वाराणसी काशीस पाठविले तर त्या यात्रेकारुचे पाठविनार्यास अर्धे पुण्य मिळते मग तो यात्रेकारुचे तेथे मेला तरी त्याचे पुण्या पाठविनार्यास अर्ध्ये पुण्य मिळते.कथेवेळी जर झोपानार्याची झोप मोडली तरी त्याचे पाप लागत नाही पण सुख अपर लागते.यज्ञासाठी जर कर्ज जर घेतले आणि ते बुडाले तर दुख मानून नये कारण त्या दोघानाही दोष लागेलच असे नाही.तुकाराम महाराज म्हणतात मी जे हे तुम्हाला दोष सांगितले आहे पाप पुण्याचे त्या प्रेमाने वागावे पापाचा नियम पुण्यावर व पुण्याचा नियम पापावर लादु नये.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
देवासाठी जाणा तयासीच – संत तुकाराम अभंग – 997
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.