हरीहरां भेद ।
नाहीं करूं नये वाद ॥१॥
एक एकाचे हृदयीं ।
गोडी साखरेच्या ठायीं ॥ध्रु.॥
भेदकासी नाड ।
एक वेलांटीच आड ॥२॥
उजवें वाम भाग ।
तुका म्हणे एकचि अंग ॥३॥
अर्थ
हरी (विष्णु) आणि हर (शिव) यांच्यामधे भेद करून अकारण वाद निर्माण करू नये.कारण ते दोन्ही एकच आहे, जसे साखर आणि तिची गोडी .फरक करणार्यांच्या डोळ्याला केवळ एका वेलांटिचा फरक दिसतो .तुकाराम महाराज म्हणतात , उजवे व डावे दोन भाग एकत्र येऊन त्याचा देह बनतो त्याप्रमाणे हरी आणि हर हे सारखेच आहे .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.