आम्ही क्षेत्रींचे संन्यासी – संत तुकाराम अभंग – 982
आम्ही क्षेत्रींचे संन्यासी । देहभरित हृषीकेशी । नाहीं केली ऐशी । आशाकामबोहरी ॥१॥
आलें अयाचित अंगा । सहज तें आम्हां भागा । दाता पांडुरंगा । ऐसा करितां निंश्चिती ॥ध्रु.॥
दंड धरिला दंडायमान । मुळीं मुंडिलें मुंडण । बंदी बंदाचि कौपीन । बहिरवास औटडें ॥२॥
काळें साधियेला काळ । मन करूनि निश्चळ । लौकिकीं विटाळ । धरूनि असों एकांत ॥३॥
कार्यकारणाची चाली । वाचावाचत्वें नेमिली । एका नेमें केली । स्वरूपीच वोळखी ॥४॥
नव्हे वेषधारी । तुका आहाच वरीवरी । आहे तैसीं बरीं । खंडें निवडि वेदांची ॥५॥
अर्थ
देह क्षेत्र जर मानले तर आम्ही त्यामधील संन्यासी आहोत व या देहात म्हणजे क्षेत्रात हृषिकेष भरलेला आहे व आम्ही आमच्या मनातून आशा व वासना बाहेर काढून टाकल्या आहे.आहो देणारा दाता हा पांडुरंग आहे असे आम्ही दृढ निश्चयाने सांगतो व त्यामुळे आम्ही आयाचित पणे राहत आहे.आम्ही या हृशिकेषाचा दंड धरण केला असून अज्ञानाचे मुळासहित मुंडण केले.व त्रीबंधाचे कौपिन घालून देह वृत्ती नाहीशी केली.आम्ही आमचे मूळ स्वरूप जाणून त्या ठिकाणी निश्चळ झालो आहे लौकिकाचा विटाळ धरून आम्ही एकांतात आलो आहोत.कार्यापुरते आम्ही कार्य करतो व आमची वाणी या हरीशी एकरूप झाली म्हणून आम्ही एकत्वाच्या नियमाने या हरीचे स्वरूप ओळखले.तुकाराम महाराज म्हणतात मी ढोंगी साधू प्रमाणे वेश धरण करणारा नाही तर वेदातील जे उपयोगी खंडे सूत्रे आहेत तेच निवडू मी तुम्हाला सांगत आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आम्ही क्षेत्रींचे संन्यासी – संत तुकाराम अभंग – 982
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.