संत तुकाराम अभंग

कन्या गौ करी कथेचा – संत तुकाराम अभंग – 98

कन्या गौ करी कथेचा – संत तुकाराम अभंग – 98


कन्या गौ करी कथेचा विकरा ।
चांडाळ तो खरा तया नांवें ॥१॥
गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण ।
यातिशीं कारण नाहीं देवा ॥२॥
आशाबद्ध नये करूं तें करिती ।
तुका म्हणे जाती नरकामधीं ॥३॥

अर्थ
जी व्यकि आपली कन्या, गाय आणि हरिकथा यांची विक्री करुन धन मिळवतो, ती वृत्तीने चांडाळ आहे .मनुष्या मधील गुण-अवगुण परमेश्वर पाहतो, जात पाहत नाही.ज्या व्यक्तीच्या अंगी परमार्थ गुण आहे, ती व्यक्ती भगवंतला अतिप्रिय आहे, आणि ज्या व्यक्तीच्या अंगी परमार्थाचे गुण नाही; ती व्यक्ती देवाल अप्रिय आहे; मग ती व्यक्ती कोणत्याही जातीची असली तरी देव त्याच्याकडे पाहत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, असे आश्यावादि लोक लालसेने नको त्या गोष्टी करतात आणि नरकात जातात .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


कन्या गौ करी कथेचा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *