पापपुण्यसुखदुःखाचीं – संत तुकाराम अभंग – 974
पापपुण्यसुखदुःखाचीं मंडळें । एक एकाबळें धाव घेती ॥१॥
कवतुक डोळां पाहिलें सकळ । नाचवितो काळ जीवांसी तो ॥ध्रु.॥
स्वर्गाचिया भोगें सरतां नरक । मागें पुढें एक एक दोन्ही ॥२॥
तुका म्हणे भय उपजलें मना । घेई नारायणा कडिये मज ॥३॥
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
पापपुण्यसुखदुःखाचीं – संत तुकाराम अभंग – 974
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.