मांडवाच्या दारा पुढें – संत तुकाराम अभंग – 96

मांडवाच्या दारा पुढें – संत तुकाराम अभंग – 96


मांडवाच्या दारा पुढें ।
आणिला म्हातारा ॥१॥
म्हणे नवरी आणा रांड ।
जाळा नवर्‍याचें तोंड ॥ध्रु.॥
समय न कळे ।
काय उपयोगीं ये वेळे ॥२॥
तुका म्हणे खरा ।
येथूनिया दूर करा ॥३॥

अर्थ
एका विवाहा प्रसंगी नवरा-नवरी वेळेवर आले नाहीत म्हणून एक तारतम्य नसलेला म्हातारा मधे बोलू लागला .नवरी वेळेवर येत नाही हे पाहुन तो म्हातारा त्या रांड नवरीला आणा आणि त्या ‘नावर्‍याचे तोड पेटून दया’ अशी अशुभ वार्ता करू लागला .कोणत्या वेळी काय बोलावे हे त्या म्हातार्‍याला कळत नाही मग त्याचा काय उपयोग आहे .तुकाराम महाराज म्हणतात, आशा मुर्ख म्हतार्‍याला मंडवातून प्रथम दूर करा .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


मांडवाच्या दारा पुढें – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.