भूतदयापरत्वें जया तया परी – संत तुकाराम अभंग – 959
भूतदयापरत्वें जया तया परी । संत नमस्कारीं सर्वभावें ॥१॥
शिकल्या बोलाचा धरीसील ताठा । तरी जासी वाटा यमपंथें ॥ध्रु.॥
हिरा परिस मोहरा आणीक पाषाण । नव्हे परी जन संतां तैसी ॥२॥
सरितां वोहोळ गंगा सागरा समान । लेखी तयाहून अधम नाहीं ॥३॥
आणीक अमुप होती तारांगणें । रविसी समान लेखूं नये ॥४॥
तुका म्हणे नाहीं नम्रता अंगी । नव्हे तें फिरंगी कठिण लोह ॥५॥
अर्थ
मनुष्य व प्राणी या मध्ये ज्याच्या त्याच्या योग्यतेने दया दाखवावी परंतु संतांना सर्वभावे नमस्कार करावा.जर तू शिकल्याचा ताठा(अभिमान)धरशील तर तुला यम मार्गाने जावा लागेल.हिरा परीस मोहरा यांची तुलना दगडाशी होऊ शकत नाही त्याप्रमाणे संतांनची तुलना सामान्य माणसाशी करू नये.नद्या ओढे यांना जर गंगे प्रमाणे किंवा सागराप्रमाणे मानले तर त्याच्या इतका दुष्ट कोणी नाही.आकाश गंगेत अनेक तारांगणे आहेत पण त्यांची तुलना सूर्याशी करू नये माणू नये.तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या अंगी नम्रता नाही ते कठीण लोखंड प्रमाणे आहेत असे समजावे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
भूतदयापरत्वें जया तया परी – संत तुकाराम अभंग – 959
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.