चोरें चोरातें करावा उपदेश – संत तुकाराम अभंग – 95
चोरें चोरातें करावा उपदेश ।
आपुला अभ्यास असेल तो ॥१॥
शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें ।
होईल आपुलें तिच्या ऐसें ॥ध्रु.॥
तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता ।
म्हणऊनि चिंता उपजली ॥२॥
अर्थ
एक चोर दुसऱ्या चोराला चोरिच्या, घरफोडीच्या युक्त्या शिकवितो.जसा त्याचा आभ्यास असेल तसाच उपदेश करतो .एखाद्या वेश्येच्या सहवासात एखादी घरंदाज स्त्री आली तर तीही कालांतराने वाममार्गी बनते.वाईट व्यक्तींच्या संगतिला राहून संगतीत राहणारा देखिल वाईट होते .तुकाराम महाराज म्हणतात, वाईट लोकांच्या संगती मला नको.कारण मला पुढील भविष्यकाळात त्यामुळे होणाऱ्या दुषपरीणामांचे भय वाटते .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
चोरें चोरातें करावा उपदेश – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.