भक्तांचा महिमा भक्तचिं – संत तुकाराम अभंग – 948

भक्तांचा महिमा भक्तचिं – संत तुकाराम अभंग – 948


भक्तांचा महिमा भक्तचिं जाणती । दुर्लभ या गति आणिकांसी ॥१॥
जाणोनि नेणते जाले तेणें सुखें । न बोलोनि मुखें बोलताती ॥ध्रु.॥
अभेदूनि भेदू राखियेला अंगीं । वाढावया जगीं प्रेमसुख ॥२॥
टाळघोळ कथा प्रेमाचा सुकाळ । मूढ लोकपाळ तरावया ॥३॥
तुका म्हणे हें तों आहे तयां ठावें । तीहीं एक्या भावें जाणीतला ॥४॥

अर्थ
भक्तांचा महिमा भक्तच जाणतात पण दुसऱ्याना हे समाजाने कठीण आहे.सर्व जाणून हि ते जाणत नाही असे दाखवितात व न बोलताही मुखाने बोलतात.देव जाणूनही ते आपल्या ठिकाणी सेवकत्व बाळगतात कारण जगामध्ये भक्ती प्रेमाचा सुकाळ वाढवा असे त्यांना वाटते.हे असे ज्ञानी लोक टाळघोष करून कथा करून प्रेमाचा सुकाळ करतात कारण मूर्ख या या भवसागरातून तरावा.तुकाराम महाराज म्हणतात ज्याने हा ऐक्यभाव जाणला असेल त्यालाच भक्तीची स्थिती ठाऊक असते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

भक्तांचा महिमा भक्तचिं – संत तुकाराम अभंग – 949

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.