शब्दा नाहीं धीर – संत तुकाराम अभंग – 94

शब्दा नाहीं धीर – संत तुकाराम अभंग – 94


शब्दा नाहीं धीर ।
ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥१॥
त्याचें न व्हावे दर्शन ।
खळा पंगती भोजन ॥ध्रु.॥
संतासी जो निंदी ।
अधम लोभासाठीं वंदी ॥२॥
तुका म्हणे पोटीं ।
भाव अणीक जया ओठी ॥३॥

अर्थ
ज्याच्या शब्दात धर्य नाही, ज्याची बुद्धि अस्थीर आहे .आशा पापी व्यक्तींचे चुकुनहि दर्शन घेऊ नये, त्याच्या पंगतिला भोजनाचे लाभ घेऊ नये .तो दुर्जन संतांची निंदा करतो व द्रव्यालाभासाठी अधम श्रीमंतांच्या पाया पडतो .तुकाराम महाराज म्हणतात, अश्या व्यक्तींच्या पोटातील (हृदयातील) व ओठातील (वाणीतील) भाव वेगवेगळा असतो .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


शब्दा नाहीं धीर – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.